साळशिंगेतील ८ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण ; जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १६ तर खानापूर तालुक्यात २ कोरोना रुग्ण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, May 16, 2020

साळशिंगेतील ८ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण ; जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १६ तर खानापूर तालुक्यात २ कोरोना रुग्ण


साळशिंगेतील ८ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण ; जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १६ तर खानापूर तालुक्यात २ कोरोना रुग्ण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : गुजरात अहमदाबाद येथून खानापूर तालुक्यातील साळशिंगे, तासगाव तालुक्यातील गव्हाण हे सांगली जिल्ह्यातील तर माण तालुक्यातील विरळी येथे काही लोक आले होते. साळशिंगे येथील महिलेला कोरोनाची लागण सुरुवातीला झाली होती. याचा साळशिंगे कनेक्शनमुळे तासगाव तालुक्यातील गव्हाण व माण तालुक्यातील विरळी येथेही लागण झालेली होती. 
तर त्याच साळशिंगे येथील महिलेच्या दिराच्या ८ वर्षाच्या मुलालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात २ कोरोन रुग्ण तर सांगली जिल्ह्यात हळू-हळू रुग्ण वाढत असून आता १६ कोरोनाचे रुग्ण झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise