बनपूरी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 26, 2020

बनपूरी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


बनपूरी येथे कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : आटपाडी तालुक्यातील बनपूरी येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे - आटपाडी तालुक्यातील बनपूरी येथील (200 मीटर) 1) बनपूरी गावचे उत्तर - प्रथमेश माने यांचे घर ते कचरे वस्ती रोड वरील अरूण पुकळे यांचे घर 2) बनपूरी गावचे दक्षिण - प्रथमेश माने यांचे घर ते लक्ष्मण धोंडी पुकळे यांचे घर 3) बनपूरी गावचे पूर्व - प्रथमेश माने यांचे घर ते आटपाडी रोड वरील हणमंत कुऱ्हाडे यांचे घर 4) बनपूरी गावचे पश्चिम - प्रथमेश माने यांचे घर ते खरसुंडी - बनपूरी रोड वरील रमेश गुजले यांचे घर, या स्थलसीमामध्ये अंतर्भूत क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून अधिसूचित केले आहे. 
बफर झोन पुढीलप्रमाणे - 1) बनपूरी गावचे उत्तर - प्रथमेश माने यांचे घर ते यमगर वस्ती रोड वरील किरण देशमुख यांचा डांबर प्लॅन्ट 2) बनपूरी गावचे दक्षिण - प्रथमेश माने यांचे घर ते बनपूरी - करगणी रोड वरील सुरेश बंडगर यांचे घर 3) बनपूरी गावचे पूर्व - प्रथमेश माने यांचे घर ते बनपूरी-तडवळे रोड वरील मच्छिंद्र पाटील यांचे घर 4) बनपूरी गावचे पश्चिम - प्रथमेश माने यांचे घर ते बनपूरी-खरसुंडी रोड वरील शहीद विष्णू पुकळे स्मारक.
 या भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise