Type Here to Get Search Results !

चंद्रकांतदादा माजी मंत्री महादेवराव जानकर यांना केंद्रात कॅबिनेटमंत्री करा : ॲड संजय माने


माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील वृत्तवाहिनीला मुलाखत दिली व जे मत व्यक्त केलं त्याप्रमाणे समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नाही. दादा आपण वैयक्तिक आणि तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने ही गोष्ट पक्षानेही जाहिररित्या मान्य केली त्याबद्दल तुमचे आम्ही स्वागत करतो.
 समाजाला लोकसंख्येच्या मानाने राज्यामध्ये व केंद्रांमध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही. महादेव जानकर हे तमाम  धनगर समाजाचे नेतृत्व तर करतातच परंतु या राज्यातीलच नव्हे तर देशातील आठरा पगड राष्ट्रीय समाजाचे सुद्धा नेतृत्व करतात, त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महादेवजी जानकर यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री करा असे आवाहन ॲड. संजय माने यांनी केले.
“जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी” हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून महादेवराव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केलेली आहे. रासप या पक्षाला ज्या गोष्टी द्यायच्या मान्य केल्या होत्या त्या भाजपने मान्य कराव्यात, महादेव जानकर याना राज्यसभेत पाठवून त्यांना केंद्रात मंत्री करावे, कारण आम्ही मित्र पक्ष म्हणून भाजपला साथ दिली आहे. भाजपचे खासदार आणि आमदार निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. याच तुमच्या मित्रपक्षाचा सन्मान आणि  तुम्ही बोलल्या प्रमाणे आमदार महादेव जानकर यांना केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री करावं आणि या राज्यांमध्ये धनगर समाजाला न्याय द्यावा..
तुम्ही समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व द्याल ही अपेक्षा असून  चंद्रकांतदादा समाज पहिल्या पासुन भाजप बरोबर आहे समाजाला फक्त तुम्हीच न्याय देऊ शकता म्हनुन महादेव जानकर यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री करावं अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीने ॲड संजय माने यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय समाज पक्षाने आजपर्यंत भाजपसोबत प्रामाणिक काम केले आहे इथुन पुढेही करत राहू अन्यथा आमचाही राजकीय पक्ष आहे. तुम्हाला जसा भाजप वाढवायचा आहे तसाच आम्हालाही रासप वाढवायचा आहे त्यासाठी सर्व मार्ग आम्ही खुले ठेवू शकतो. असा इशाराही रासप नेते ॲड.संजय माने पाटील यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies