बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 29, 2020

बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : बंधपत्रित ( बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. कोरोना लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार आहे. डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार, आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ७० हजार ऐवजी ८५ हजार इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना ५५ हजारांऐवजी ७० हजार, इतर भागातील  विशेषज्ञ डॉक्टर्सना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन  देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise