बनपुरी आणखी २ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १३ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 26, 2020

बनपुरी आणखी २ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १३


बनपुरी आणखी २ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह ; आटपाडी तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १३ 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : बनपुरी  ता. आटपाडी, जि. सांगली येथील कोरोनाग्रस्ताची लहान बहीण (वय १०) व वडील (४२) वर्ष यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला  असून बनपुरी मध्ये ३ कोरोना रुग्ण झाले आहेत. 
आज आलेल्या अहवालामध्ये बनपुरी येथे मुंबईहून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. आता त्याच कोरोनाग्रस्ताच्या वडीलांना व लहान बहिणीला कोरोनाची लागण झाली आहे. 
सोनारसिद्ध मध्ये ३, आटपाडी शहर ३ , पिंपरी खुर्द व पिंपरी बुद्रुक १ जांभूळणी १, कामथ १ व बनपुरी ३ असे १३ कोरोना ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त १३ रुग्ण आटपाडी तालुक्यातच आढळून आले आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise