Type Here to Get Search Results !

लॉकडाऊन कालावधीमधील आटपाडी शहरातील दुकानांचे वेळापत्रक जाहीर ; जीवनावश्यक वस्तू दुकाने सोडून इतर दुकाने आठवड्यातून ४ दिवस व जीवनावश्यक वस्तूची दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी 6 पर्यंत चालू राहणार ; पहा सविस्तर


लॉकडाऊन कालावधीमधील आटपाडी शहरातील दुकानांचे वेळापत्रक जाहीर
जीवनावश्यक वस्तू दुकाने सोडून इतर दुकाने आठवड्यातून ४ दिवस व जीवनावश्यक वस्तूची दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी 6 पर्यंत चालू राहणार ; पहा सविस्तर 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : केंद्र सरकारकडून लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात आटपाडी शहरातील लॉकडाऊन कालावधीमधील शहरातील दुकानांचे वेळापत्रक जाहीर आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी जाहीर केले असून जीवनावश्यक वस्तूची दुकाने सोडून इतर दुकाने आठवड्यातून ४ दिवस व जीवनावश्यक वस्तूची दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी 6 पर्यंत चालू राहणार

आठवड्यातील चार दिवस रविवार, मंगळवार, बुधवार, व शुक्रवार सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहणारी दुकाने खालील प्रमाणेचिकन, मटण, मासेविक्री, कापड दुकान, टेलरिंग, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री व दुरुस्ती, मोबाईल शॉपी, गिफ्ट शॉपी, लेडीज शॉपी,  स्पोर्ट्स दुकाने, स्टेशनरी,  वह्या पुस्तके दुकाने, तसेच शासनाने परवानगी दिल्यामुळे  सकाळी 10 ते 6 या वेळेत सरकारमान्य देशी दारू,  वाईन व बियर फक्त सरकारमान्य देशी दारू दुकान तसेच वाईन व बिअर शॉपी या दुकानां मधूनच फक्त योग्य त्या नियम व अटींचे पालन करून मिळणार (व्हिस्की विक्रीस बंदी) तसेच जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व वस्तूंची उर्वरित सर्व इतर दुकाने या ४ दिवसांमध्ये चालू राहणार. वरील दुकाने सोमवार गुरुवार व शनिवारी पूर्ण दिवस बंद राहणार.

दररोज सकाळी 9 ते 6 पर्यंत चालू राहणारी दुकाने खालील प्रमाणेधान्य किराणामाल, फळे व भाजीपाला फिरून विक्री, बेकरी दुकाने, आईस्क्रीमची पार्सल सेवा, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई दुकाने,  चहा, वडापाव व इतर हॉटेल पदार्थ तसेच खानावळ पदार्थ जेवण फक्त पार्सल सेवा, बिसलेरी पाणी, पिठाची गिरणी, मिरची कांडप मशिन, शेवया मशीन, हार-फुले, सर्व वाहन व स्पेअर पार्ट विक्री, गॅरेज, पंक्चर दुकान, कृषी सेवा केंद्र, हार्डवेअर, सायकल दुकान, मोटर रिवायडींग, फोटो शॉपी, फॅब्रिकेटर्स, मनी गाठवणार, पत्रावळी दुकाने, इस्त्री दुकाने, वर्तमानपत्र विक्री, सुतार, कुंभार, लोहार यांची त्यांच्या त्यांच्या व्यवसायाची दुकाने, चप्पल विक्री व दुरुस्ती, केरसुणी विक्री, झेरॉक्स सेंटर, कॅम्पुटर सेंटर, खाजगी ऑफिसेस, बिल्डिंग मटेरियल वीट, सिमेंट, फरशी वगैरे प्लंबिंग मटेरियल, तसेच शेती विषयक सर्व दुकाने दररोज सकाळी 9 ते 6 या वेळेतच सुरू राहणार. वरील दुकाने दररोज वरील वेळेनुसार चालू राहणार.
  • सलून व पार्लर दुकाने दर रविवार मंगळवार बुधवार व शुक्रवार सकाळी 7 ते 2 या वेळेत योग्य त्या नियमांचे व अटींचे पालन करून चालू राहतील.
  • ज्वेलरी दुकाने मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 चालू राहतील.
  • पान व तंबाखूजन्य पदार्थ दुकाने शासकीय नियमानुसार पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार.
  • दवाखाने व औषध विक्री सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत दररोज चालू राहतील 
  •  चष्मा विक्री दुकाने दर रविवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवार सकाळी 9 ते  सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहतील.
  • पेट्रोल डिझेल पंप दररोज नेहमीप्रमाणे चालू राहतील.

सांगली जिल्ह्यामध्ये सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू आहे त्यामुळे कोणीही सदर वेळेत सार्वजनिक रस्त्यावर फिरू नये. चाकी वाहनावर एकाच मोटर सायकल स्वारास प्रवास करण्यास परवानगी आहे तसेच 4 चाकी वाहनांमध्ये ड्रायव्हर व आणखी दोन प्रवासी म्हणजेच एकूण तिघांना सदर वाहनांमध्ये प्रवास करण्यास शासकीय परवानगी आहे त्यामुळे कोणीही नियमाचे उल्लंघन करू नये कारवाई होऊ शकते.
सोशल डिस्टन्स पाळून वस्तू विक्री करण्याचे आहे. तसेच सर्वांनी मास्क वापरण्याचा आहे. दुकानात येणार्या  प्रत्येक  व्यक्ती प्रवेश करते वेळी सॅनिटायझर चा वापर करण्याचा आहे. फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या दुकानदारांनी बाजार पटांगण भाजीमंडई येथे कोणीही विक्री करता थांबण्याचे नाही. दुकानात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे नाव व मोबाईल नंबर आपल्या रजिस्टर मध्ये नोंद करून ठेवण्याचे आहे. वरील सर्व उद्योग-व्यवसाय शासनाने कोरोना च्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करून व्यवसाय करण्याचे आहेत. वरील सर्व दुकानांची वेळापत्रक हे दिनांक 31 मे 2020 पर्यंत किंवा पुढील वेळापत्रक येईपर्यंत सदरचे नियम चालू राहतील असे सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी सांगतिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies