Type Here to Get Search Results !

आटपाडी शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागात ही कोरोनाची लागण ; पिंपरी बुद्रुक येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह



आटपाडी शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागात ही कोरोनाची लागण ; पिंपरी बुद्रुक येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह   
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये दिल्लीहून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला होता. तर त्यांच्या संपर्कातील व्यक्ती निगेटिव्ह आल्याने आटपाडीकरांची धाकधूक कमी झाली होती. परंतु आता मुंबईहून आलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले तर तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली असून पिंपरी बुद्रुक येथील बाहेरगावाहून आलेल्या रुग्णाला कोरोनाची लागणे झाली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे. 
सदरची व्यक्ती हे बाहेर गावाहून आलेली होती. त्या व्यक्तीला संस्था क्वारंनटाइन क्वारंनटाइन करण्यात आले होते. काल रात्री त्याला कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यास मिरज येथील कोव्हीड रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून सदर रुग्ण पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.साधना पवार यांनी दिली. आटपाडी शहरात आता दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर ग्रामीण भागातील पिंपरी बुद्रुक येथे एकजन असे तालुक्यामध्ये तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies