Type Here to Get Search Results !

आटपाडीत कोरोना रुग्ण सापडलेला परिसर सील ; आम. अनिलभाऊ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली उपयायोजना संदर्भात बैठक संपन्न ; कंटेनमेंट झोन परिसरातील सर्व दुकाने १४ दिवस बंद राहणार


आटपाडीत कोरोना रुग्ण सापडलेला परिसर सील ; आम. अनिलभाऊ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली उपयायोजना संदर्भात बैठक संपन्न ; कंटेनमेंट झोन परिसरातील सर्व दुकाने १४ दिवस बंद राहणार  
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरात कोरोना चा शिरकाव झाल्यामुळे आटपाडी कडकडीत शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. दिल्लीहून आटपाडीत गलाई व्यवसायिक पत्नी व मुलगी 13 मे रोजी बसने आले होते. तो आटपाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सिद्धनाथ चित्रमंदिर परिसरात पार्वती लॉजमध्ये 17 नंबर खोलीत क्वारंटाईन झाले होते. रविवारी त्रास सुरू झाल्याने आटपाडी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यास मिरजेच्या आयसोलेशन कक्षात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. त्याची स्वॅब पॉझिटिव्ह आला आल्याने पार्वती लॉज सील करण्यात आले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण औषध फवारणी परिसरात केली. आटपाडी शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. बाजारपेठेतही जीवनावश्यक सेवा बंद ठेवण्यात आली. 
मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी पदाधिकारी बैठक होऊन उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा झाली. विटयाचे पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर इम्रान तांबोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, सरपंच वृषाली पाटील, उपसरपंच प्रा.डॉ. अंकुश कोळेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. उमाकांत कदम यांच्यासह अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
पार्वती लॉज पासून 100 मीटर कंटेनमेंट झोन करण्यात आला तर एक किलोमीटर बफर झोन म्हणून करण्याचे ठरले त्याची पहाणी करण्यात आली. कंटेनमेंट झोन सोडून मेडिकल व दवाखाने यांना फक्त सुरू करण्यात येईल ठरले. साई मंदिर चौक, निंबवडे रस्त्यावरील विश्रामधाम धाम, दिघंची रस्ता, सांगोला कॉर्नर, शेटफळ रस्ता आदी शहरात प्रवेश करणारे रस्त्यावर नाका-बंदी करण्यात आली आहे. आरोग्य विभाग, आशा सेविकांना आटपाडी शहराचा सर्व्हे करण्याचे काम सुरू झाले. दिल्लीहून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आटपाडी तालुक्यात प्रथमच कोरोना रुग्ण सापडल्यामुळे आटपाडी शहर दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आले. आटपाडी शहरातील गल्ली बोळा रस्ते बंद करण्यात आले आहेत. भाजी मंडई व दुधाचा संकलन केंद्र आता कंटेनमेंट झोनच्याबाहेर ठेवण्यात येणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे आटपाडीतील एमएसईबी परिसरात त्याचे घर आहे तर नातेवाईक कौठुळी येथे आहेत. क्वारंटाईनमध्ये असताना त्याच्याशी संपर्कात आलेल्या सर्वांची यादी प्राथमिक आरोग्य केंद्र विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली त्यांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 
आटपाडी तालुका हा सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळे आटपाडी तालुक्यात विशेष काळजी घेण्यात आली होती. दोन महिने बाजारपेठही बऱ्यापैकी बंद ठेवण्यात आली होती. कालपासून बाजारपेठ उघडण्याचा निर्णय ग्राम समितीने घेतला होता. त्यापूर्वी आटपाडी शहरात कोरोना रुग्ण सापडल्याने आटपाडी शहरातील कंटेनमेंट परिसरातील सर्व दुकाने १४ दिवस बंद राहणार आहेत. 500 मीटरचा कंटेनमेंट झोन ठेवण्याचे ऐवजी 100 मीटरचा सोयीचा करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर झाला. परराज्यातून दररोज रोग येत असल्याने तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत जाण्याचा धोका आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies