आटपाडीकरांच्या आनंदावर विरजन ; कोरोनाग्रस्त सापडल्याने उद्यापासून सुरु होणारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार : सरपंच सौ. वृषाली पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, May 18, 2020

आटपाडीकरांच्या आनंदावर विरजन ; कोरोनाग्रस्त सापडल्याने उद्यापासून सुरु होणारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार : सरपंच सौ. वृषाली पाटील


आटपाडीकरांच्या आनंदावर विरजन ; कोरोनाग्रस्त सापडल्याने उद्यापासून सुरु होणारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार : सरपंच सौ. वृषाली पाटील 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : केंद्र सरकारकडून लॉकडाउन 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात आटपाडी शहरातील लॉकडाऊन कालावधीमधील शहरातील दुकानांचे वेळापत्रक जाहीर आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी जाहीर केले.
परंतु आज आटपाडी शहरात कोरोनाग्रस्त सापडल्याने व्यावसायिकांच्या आनंदावर विरजन पडले. आहे. शहरामध्ये जीवनावश्यक वस्तूची दुकाने सोडून इतर दुकाने आठवड्यातून ४ दिवस व जीवनावश्यक वस्तूची दुकाने दररोज सकाळी ९ ते सायंकाळी 6 पर्यंत चालू राहणार होती. यामध्ये चिकन, मटण, मासेविक्री, कापड दुकान, टेलरिंग, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री व दुरुस्ती, मोबाईल शॉपी, गिफ्ट शॉपी, लेडीज शॉपी,  स्पोर्ट्स दुकाने, स्टेशनरी,  वह्या पुस्तके दुकाने, तसेच शासनाने परवानगी दिल्यामुळे  सकाळी 10 ते 6 या वेळेत सरकारमान्य देशी दारू,  वाईन व बियर फक्त सरकारमान्य देशी दारू दुकान आठवड्यातील ४ दिवस चालू राहणार होती. 
तर चिकन, मटण, मासेविक्री, कापड दुकान, टेलरिंग, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री व दुरुस्ती, मोबाईल शॉपी, गिफ्ट शॉपी, लेडीज शॉपी,  स्पोर्ट्स दुकाने, स्टेशनरी,  वह्या पुस्तके दुकाने, तसेच शासनाने परवानगी दिल्यामुळे  सकाळी 10 ते 6 या वेळेत सरकारमान्य देशी दारू,  वाईन व बियर फक्त सरकारमान्य देशी दारू दुकान तसेच वाईन व बिअर शॉपी या दुकानां मधूनच फक्त योग्य त्या नियम व अटींचे पालन करून मिळणार (व्हिस्की विक्रीस बंदी) तसेच जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व वस्तूंची उर्वरित सर्व इतर दुकाने या ४ दिवसांमध्ये चालू राहणार. वरील दुकाने सोमवार गुरुवार व शनिवारी पूर्ण दिवस बंद राहणार होती. परंतु आता आटपाडी शहरात कोरोनाग्रस्त सापडल्याने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने ती बंद राहणार असल्याचे सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Advertise