गटविकास अधिकाऱ्याच्या आदेशाला “या” ग्रामपंचायतीने दाखविली केराची टोपली - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, May 22, 2020

गटविकास अधिकाऱ्याच्या आदेशाला “या” ग्रामपंचायतीने दाखविली केराची टोपली


गटविकास अधिकाऱ्याच्या आदेशाला “या” ग्रामपंचायतीने दाखविली केराची टोपली
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : अजनाळे ता. सांगोला ग्रामपंचायतीने मागासवर्गीयांना १५ टक्के फंडातून जीवनावश्यक साहित्याचे वाटप करावे अशी मागणी गावातील ग्रामस्थांमधून केले जात आहे. गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी सर्व ग्रामपंचायतींना लेखी आदेश दिले आहेत तरीदेखील आजनाळे ग्रामपंचायतीने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.  त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यामध्ये लॉकडाऊन व संचारबंदीने लोकांचे कामधंदे व्यवसाय बंद आहेत. नागरिकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने याची तात्काळ दखल घेऊन १५ टक्के मागासवर्गीय फंडातून तेल, साखर, डाळी, शेंगदाणे इ. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून मागासवर्गीयांचा निधी खर्च करावा अशी मागणी अजनाळे गावातून केली जात आहे.

अजनाळे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये मागासवर्गीयांचा हक्काचा १५ टक्के निधी खर्च केला आहे का? या विषयी शंका व्यक्त केली जात आहे.  १५ टक्के निधी खर्च न करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याची तात्काळ बदली करावी.
समाधान धांडोरे
युवा नेते ,अजनाळे


No comments:

Post a Comment

Advertise