खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७७० नागरिक संस्थात्मक व होम क्वारंटाईन ; झरे व पिंपरी बुद्रुक येथील तिघांचे अहवाल प्रलंबित - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 19, 2020

खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७७० नागरिक संस्थात्मक व होम क्वारंटाईन ; झरे व पिंपरी बुद्रुक येथील तिघांचे अहवाल प्रलंबित


खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७७० नागरिक संस्थात्मक व होम क्वारंटाईन
झरे व पिंपरी बुद्रुक येथील तिघांचे अहवाल प्रलंबित
माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/मनोज कांबळे : आटपाडी तालुक्यात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात बाहेरून नागरिक आल्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम भागातील झरे व पिंपरी बुद्रुक या गावातील तीन व्यक्तींचे स्लॅब अहवाल पाठविले असून त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. 
खरसुंडी आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या गावात ७७० नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आटपाडी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तालुक्याच्या पश्चि म भागातील प्रत्येक गावात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग दररोज या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात गुंतले आहे. परगावाहून येणाऱ्या लोकांमुळे प्रत्येक गावाच्या नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाले आहे. जोपर्यंत शहरी भागातून नागरिक येत नव्हते तोपर्यंत प्रत्येक गावातील नागरिकांमध्ये शांतता होती. मात्र या आठवड्यात शहरी भागातून येणार्याू नागरिकांची मोठी वाढ झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या गावांमधील झरे व पिंपरी बुद्रुक गावातील तीन संशयित आढळून आल्याने आरोग्य केंद्राच्या वतीने मिरज येथील कोविड सेंटर येथे पाठवण्यात आले. या संशयित व्यक्ती गलाई व्यवसायिक असून दिल्ली येथून आलेल्या आहेत. झरे येथील व्यक्तीस सोमवारी रात्री दहा वाजता तर पिंपरी बुद्रुक येथील दोन व्यक्तींना मंगळवारी दुपारी मिरज येथे पाठवण्यात आले आहे. झरे येथील एका व्यक्तीचा अहवाल आज संध्याकाळी प्राप्त होण्याची शक्यता आहे. तर पिंपरी बुद्रुक येथील दोन व्यक्तींचा अहवाल बुधवारी येण्याची शक्यता आहे. या तिन्ही व्यक्तींना आरोग्य अधिकारी डॉ.महेश जाधव यांनी मिरज रुग्णालयात पाठवले आहे. आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या गावात शहरी भागातून आलेल्या ७७० नागरिकांना खरसुंडी, घरनिकी व झरे येथे संस्थात्मक तर इतर गावात होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात शहरी भागातून दररोज नागरिक येत आहेत. होम क्वारंटाईन करण्यात येत असलेल्या काही गावातील जागेचा प्रश्नी गंभीर बनला आहे. शहरी भागातून दररोज नागरिक असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे.


No comments:

Post a Comment

Advertise