Type Here to Get Search Results !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे गाव सलग 3 दिवस पूर्ण बंद ; नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा सरपंचांचा इशारा


माणदेश एक्सप्रेस न्युज
लेंगरे/वार्ताहर : करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत याच धर्तीवर लेंगरे येथील आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीने  निर्णय घेऊन लेंगरे गाव दि. 12/05/2020 ते दि 15/05/2020 पर्यत संपूर्ण गाव कडकडीत बंद राहणार आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मिटींगमध्ये खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.  
यामध्ये दि.12/05/2020 ते दि. 14/05/2020 सलग 3 दिवस लेंगरे गाव पूर्ण बंद राहील. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. होम कॉरंटाईन असलेले बाहेर फिरल्यास र.रु. 5000/- दंड  व फौजदारी कारवाई करण्यात येईल. मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड करणेत येईल. सोशल डिस्टन्स न पाळल्यास 1000 रुपये दंड. बाहेरुन गावात येण्याऱ्यांसाठी 3 दिवस पूर्ण बंदी घातली आहे. वार्डनिहाय पथक कारवाई करणार. गावातून 3 दिवस बाहेर जाण्यास बंदी घातली आहे. बँका, सर्व दुकाने, दारू दूकाने १००% बंद ठेवणेत येणार.सार्वजनिक ठिकाणी, चौकात, मंदिरात बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार.गावात विनाकारण दुचाकीवर डबल शीट फिरल्यास वाहन जप्त व दंडात्मक कारवाई करण्यात येईल.विनाकारण चारचाकी वाहने गावात फिरल्यास वाहन जप्त करण्यात येईल. असे  नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे.
लेंगरेकरांनी घराबाहेर पडू नये
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लेंगरे गावातील सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरांमध्ये थांबावे कोणीही सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरती न येता बंद यशस्वी करावा  व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच राधिका  बागल यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies