दिघंचीत उद्यापासून 3 दिवस जनता कर्फ्यु ; नागरिकांनी सहकार्य करण्याचे सरपंच अमोल मोरे यांनी केले आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, May 19, 2020

दिघंचीत उद्यापासून 3 दिवस जनता कर्फ्यु ; नागरिकांनी सहकार्य करण्याचे सरपंच अमोल मोरे यांनी केले आवाहन


दिघंचीत उद्यापासून 3 दिवस जनता कर्फ्यु ; नागरिकांनी सहकार्य करण्याचे सरपंच अमोल मोरे यांनी केले आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी मध्ये कोरोना चा रुग्ण सापडल्याने उद्या बुधवारपासून शुक्रवार पर्यंत सलग तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नका. सर्व व्यापार पेठ बंद राहील याची दखल व्यापारी बंधू व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन सरपंच अमोल मोरे यांनी केले आहे.
तीन दिवसानंतर व्यापारपेठ चालू करण्यासाठी शासनाकडून येणाऱ्या सुचना देण्यात देण्यात येईल त्यानुसार व्यापार पेठ सुरू राहील. संकट आपल्या दारावर येऊन ठाकले आहे. त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे गावामध्ये कोणीही विनाकारण फिरू नका, प्रशासनाला त्रास होईल असे कोणतेही काम करू नका प्रशासनास सहकार्य करून जनता कर्फ्यू यशस्वी करा असे अमोल मोरे म्हणाले. 


No comments:

Post a Comment

Advertise