पालघर हत्याकांडातील आरोपींची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यादी केली जाहीर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, April 22, 2020

पालघर हत्याकांडातील आरोपींची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यादी केली जाहीर


पालघर हत्याकांडातील आरोपींची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यादी केली जाहीर 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालघर हत्याकांडातील आरोपींची यादी केली जाहीर करण्यार असल्याचे सांगितले होते त्यानुसार त्यांनी ती यादी सोशल मिडीयाद्वारे खुली केली आहे
.घटनेनंतर गुन्हेगार बाजूच्या जंगलात पळून गेले होते. तिथून त्यांना ताब्यात घेतलं. त्या 101 जणांची यादी त्यांनी जाहीर केली. पालघरच्या घटनेत एकही मुस्लीम नव्हता. ही घटना घडत असताना काही जण 'ओये बस', 'ओये बस' असं म्हणत होते. त्या ऐवजी शोएब असं बोललं जात असल्याचा गैरसमज पसरवण्यात आला. या घटनेला जातीय रंग देण्यात आला. ही दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रकरणात जातीचं राजकारण आणण्याचा प्रयत्न केला गेला. असे ते म्हणाले.No comments:

Post a Comment

Advertise