Type Here to Get Search Results !

लॉकडाऊनचा असा ही उपयोग ; तीन बहिणींनी मिळून जोपासला चित्रकलेचा छंद ; अंगणातील दगडावर काढली चित्रे


लॉकडाऊनचा असा ही उपयोग 
तीन बहिणींनी मिळून जोपासला चित्रकलेचा छंद ; अंगणातील दगडावर काढली चित्रे 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : जगभर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक देशांमध्ये लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. या लॉकडाऊन दरम्यान वेळ घालवण्यासाठी अनेक जण इंटरनेट. गेम्स. सोशल मीडियाचा आधार घेत आहेत, तर अनेक जण शासनाचे नियम पाळत घरीच सुरक्षित राहून वेळेचा सदुपयोग करून घरांमध्ये कुटुंबासमवेत वेगवेगळे उपक्रम, नवनवीन कला शिकत आहेत. 
सध्या लॉकडाऊनमुळे मोकळ्या वेळेचे सदुपयोग काही जण मोठ्या खुबीने करीत आहेत. आटपाडी शहरातील तिघी बहिणींनी आपल्या कल्पकतेने सहज व सुंदर अंगणातील पडलेल्या दगडांवर हुबेहूब मेंढी, जहाज, डॉल, निसर्ग चित्र, समुद्र, मधमाशी व इतर चित्रे कलर ने चित्र रेखाटले असून त्यांच्या या कल्पकतेला दाद मिळत आहेत. 
दौंडे परिवारातल्या मानसी, शिवानी, कल्याणी या तिन्ही बहिणी बाहेर न कुठे जाता चित्रकलेचा छंद जोपासत आहेत. चौंडेश्वरी पतसंस्थेचे माजी चेअरमन चंद्रकांत दौंडे यांच्या या तिन्ही कन्या असून त्यांनी वेळेचा सदुपयोग करून आपल्या कला कौशल्यांना वाव देत आहेत. यामध्ये त्यांना कुटुंबाची साथ मिळत आहे, यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आमचा वेळही मजेत असून या निमित्ताने  कोरोना ला हद्दपार करुया.  विशेषतः महिलांनी घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित थांबून आपल्यातील कलागुणांना वाव देऊन छंद जोपासू व प्रशासनास सहकार्य करू असा संदेश दिला. 




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies