सासनकाठी सोहळ्यादिवशी नाथनगरी खरसुंडीत शुकशुकाट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, April 20, 2020

सासनकाठी सोहळ्यादिवशी नाथनगरी खरसुंडीत शुकशुकाट


सासनकाठी सोहळ्यादिवशी नाथनगरी खरसुंडीत शुकशुकाट 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मनोज कांबळे/खरसुंडी : महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यात प्रसिद्ध असलेल्या नाथनगरीत यात्रेचा मुख्य दिवस असूनही पूर्णपणे शुकशुकाट होता. सासनकाठी सोहळ्याच्या मुख्य दिवशी शासनाच्या आदेशाचे पालन करून औपचारिक पूजा करण्यात आली.
महाराष्ट्रासह इतर राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धनाथ देवाच्या चैत्री यात्रेचा कालावधी १५ ते २० एप्रिल होता. या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविकांची गर्दी होते. मात्र "कोरोना" च्या पार्श्वभूमीवर शासनाने देशातील सर्व यात्रा, सण-उत्सव रद्द केले आहेत. शासनाच्या आदेशाचे पालन करत येथील श्रीनाथ देव देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीने सासनकाठी सोहळा रद्द केला. खरसुंडी देवस्थानकडून भाविकांनी नाथनगरीत न येण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वसभूमीवर आटपाडी पोलिसांचा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे नेहमी "नाथबाबाच्या नावानं चांगभलं" च्या गजराने दुमदुमूनाऱ्या नाथनगरीत सोहळ्याच्या मुख्य दिवशी पूर्णपणे शुकशुकाट होता.

No comments:

Post a Comment

Advertise