Type Here to Get Search Results !

उजणीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडा राहुल बिडवे ; रोटेशन लांबत चालल्याने पिके जळण्याची भिती


उजणीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडा 
राहुल बिडवे ; रोटेशन लांबत चालल्याने पिके जळण्याची भिती 
माणदेश एक्सप्रेस न्युज
पंढरपूर : भीमा पाटबंधारे विभागाने उजव्या कालव्यातून पाणी सोडले नाही. दोन तारखेपासून उजनीच्या मुख्य कालव्यास पाणी सोडले मात्र उजव्या कालव्यात सध्या पाणी आले नाही. त्यामुळे रोटेशन लांबत चालले आहे. माळशिरस तालुक्याला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाणी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांची पिके ऊस, डाळिंब, द्राक्ष, केळी, गहू इत्यादी पिके जळून जाण्याची शक्यता आहे. 
पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांकडून भरमसाठ पाणीपट्टी वसुली करत साखर कारखानदार यांना पत्र देऊन पाणीपट्टी वसुली करून घेतो. परंतु शेतकऱ्यांना वेळेवर पाणी का देत नाही? सद्यस्थितीत अवकाळी पाऊस पडल्याने पिकांना पाणी लागत आहे. पाटबंधारे विभागाने जर वेळेवर पाणी सोडले नाही तर शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असून त्यास जबाबदार कोण?  त्यामुळे उजनी कालवा यास तातडीने पाणी सोडावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 
यावेळी शरद क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रमसिंह लाटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ घार्गे, गौरव लोखंडे ,सोमनाथ यादव, सचिन नष्टे उपस्थित होते.

उजणीच्या मुख्य कालव्यातुन 2 तारखेला पाणी सोडले मात्र उजव्या कालव्यातुन अद्याप पाणी सोडलेले नाही शेतकऱ्यांची पिके पाणी मागत आहेत तरी तातडीने पाणी सोडा अन्यथा पंढरपूर पुणे रोडवर बेमुदत रस्तारोको  करणार
राहुल बिडवे
स्वाभिमानी शेतकरी संघटना



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies