मनसेचा वर्धापन दिन माळशिरस येथे साजरा ; वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न ; ३२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, March 10, 2020

मनसेचा वर्धापन दिन माळशिरस येथे साजरा ; वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न ; ३२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान


मनसेचा वर्धापन दिन माळशिरस येथे साजरा 
वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न ; ३२१ रक्तदात्यांनी केले रक्तदान
माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस  येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन व जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मनसेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांच्यावतीने करण्यात होते. या रक्तदान रक्तदान शिबिरात ३२१ जणांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन माळशिरसचे  माळशिरस पोलिस निरीक्षक विश्वंभर गोल्डे, यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी मनसेच्या महिला आघाडी सेना जिल्हाध्यक्ष निकिताताई पवार, रेश्माताई टेळे,  ज्योती देशमाने, मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, तालुकाध्यक्ष सुरेश टेळे,  डॉ.आप्पासाहेब टेळे, नगरसेवक सुरेश वाघमोडे, गंगाधर पिसे,  संतोष वाघमोडे, मारुती देशमुख, बाळासाहेब सरगर, सोमनाथ वाघमोडे, आकाश सिद, अशोक वाघमोडे, भगवान थोरात, आबा धाईजे, शिवाजीराव सिद, अॅड.संग्राम पाटील, विकास धाईजे, डॉ.तुकाराम ठवरे, बाबासाहेब माने, आजित बोरकर, शिवराज पुकळे, किरण साठे, बाबा मदने, निळकंठ पाटील, संतोष वाघमोडे, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.नितिन सिद, डॉ. अनिल पाटील, डॉ.मच्छिंद्र गोरड, डॉ.मोहन  वाघमोडे, डॉ. बंडगर, डॉ. आबा सिद, संदिप पाटील, प्रकाश पिसे, प्रकाश आंबुडकर, मारूती सिद, लक्ष्मण सिद, राजाभाऊ टेळे, गोपाळ सिद, मायाप्पा जावळे उपस्थित होते.
यावेळी पी.आय. विश्वंभर गोल्डे, निकिता पवार  यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  संदिप सिद, सुरेश वाघमोडे, भाऊसाहेब टेळे, नदीम मुलाणी, अनिकेत काशिद  यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Advertise