महावितरणच्या गलथान कारभारामुळे अजनाळे गावातील सतत विजेचा खोळंबा ; अधिकाऱ्यांचे जाणून बुजून दुर्लक्ष - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, March 21, 2020

महावितरणच्या गलथान कारभारामुळे अजनाळे गावातील सतत विजेचा खोळंबा ; अधिकाऱ्यांचे जाणून बुजून दुर्लक्ष


महावितरणच्या गलथान कारभारामुळे अजनाळे गावातील सतत विजेचा खोळंबा
अधिकाऱ्यांचे जाणून बुजून दुर्लक्ष
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : अजनाळे ता. सांगोला, जि. सोलापूर गावातील गाव डीपी चा सतत खोळंबा होत असल्यामुळे गावामध्ये गेल्या दोन दिवसापासून लाईट नसल्यामुळे गावातील नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे गाव डीपी असून अडचण नसून खोळंबा अशी दैनिय अवस्था झाली आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांगून सुद्धा महावितरणचे अधिकारी याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता उद्धटपणे उत्तरे देत आपली धन्यता मानतात. अशा या महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब कोण विचारणार? अशी प्रतिक्रिया गावातून व्यक्त केली जात आहे. लाईट बिल वसुलीच्या बाबतीमध्ये आघाडीवर असणारे हे गाव मात्र महावितरणच्या निष्काळजीपणामुळे सतत गावात विजेचा खोळंबा होत असल्यामुळे लाईट बिल भरायचे कशासाठी? अशी चर्चा गावातून जोर धरू लागली आहे. महावितरणच्या अधिकार्यां ना व कर्मचार्यांचना याचे काही देणे-घेणे नाही. सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे गावातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. गावातील गाव डीपी चा  कायमचा प्रश्न  न मार्गी लागल्यास  महावितरणचा  एक ही कर्मचारी  गावात फिरकू देणार नाही  असा इशारा  सरपंच अर्जुन कोळवले यांनी दिला आहे.

गाव डीपीला ॲडिशनल गाव डीपी देऊन चार महिने होऊन गेले तरी अद्यापर्यंत डीपी चालू झाल्या नसल्यामुळे महावितरणच्या  अधिकाऱ्याशी संगणमत करून  संबंधित ठेकेदाराने याचे बिल काढून घेऊन सुद्धा डीपी चे काम अर्धवट केल्यामुळे हा डीपी बंद अवस्थेत आहे. तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन ॲडिशनल गाव डीपी सुरळीत चालू करावा

No comments:

Post a Comment

Advertise