आटपाडीत साजरा होणार माता रमाई जन्मोत्सव दि. १ ते ७ जन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन ; चरित्रग्रंथाचे क्रमशः वाचन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, February 1, 2020

आटपाडीत साजरा होणार माता रमाई जन्मोत्सव दि. १ ते ७ जन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन ; चरित्रग्रंथाचे क्रमशः वाचन


माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : माता रमाईच्या जयंतीनिमित्त दि. १ फेब्रुवारी ते दि. ७ फेबुवारी या सप्ताहामध्ये आटपाडी येथील नालंदा बौद्ध विहार येथे सायं. 5.00 ते 6.00 या वेळेत बाळासाहेब कांबळे लिखित माता रमाई आंबेडकर यांच्या चरित्रग्रंथाचे क्रमशः वाचन आयोजित करण्यात आले आहे. 
आटपाडी शहरामध्ये प्रथमच माता रमाईच्या चरित्रग्रंथाचे क्रमशः वाचन होणार आहे. माता रमाई जन्मोत्सव चरित्र वाचन सप्ताहाचे आयोजन आंबेडकर प्रेमी महिलांनी केले असून चरित्र ग्रंथाचे वाचन सौ अनिषा जावीर करणार आहेत. या सप्ताहाचा शुभारंभ दिनांक 1 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता होणार आहे तर सप्ताहाचा सांगता समारंभ व  व माता रमाई  यांचा  जन्मोत्सव दि. ७ फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी ५.०० वा. होणार आहे. तरी आटपाडी व आटपाडी परिसरातील माता रमाई व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी महिलांनी या चरित्रग्रंथाचे क्रमशः वाचन मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise