आदर्श इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीच्या मुलांची निवड - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, February 1, 2020

आदर्श इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीच्या मुलांची निवड

फोटो ओळ : आदर्श इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीच्या निवड झालेल्यांना निवडीचे पत्र देताना कंपनीचे अधिकारी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : लोकनेते हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित  आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च सेंटर विटा येथे ए.एस.पी. ओएल मिडीया प्रा लि  कंपनीने त्यांच्या सीईओ व एम.डी.  उपाध्यक्ष, प्रोडक्शन मॅनेजर यांनी  प्लेसमेंट ड्राईव्ह साठी भेट दिली.  यावेळी संगणक विज्ञान अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी, यांत्रिक अभियांत्रिकी विभागातील निकषनुसार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी योग्यता चाचणी मध्ये पदवीचे २४ व डिप्लोमाचे ०९ विद्यार्थी विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले. मुलांच्या स्पर्धेमधून कंपनीने चांगल्या व योग्य पॅकेजसहित  १० मुला मुलींची निवड केली. 
यावेळी महाविद्यालय डायरेक्टर पुजा पाटील, प्राचार्य श्री, भोसले, श्री. महाडिक व विद्यार्थी समन्वयक रविराज सुर्यवंशी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विभागनिहाय टी.पी.ओ. श्री. जाधव सर,  श्री. निचळ, श्री. साळुंखे, श्री. मस्के,श्री. यादव व ट्रेनिंग व प्लेसमेंट विद्यार्थी प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिवरावभाऊ पाटील व अध्यक्ष वैभवदादा पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. No comments:

Post a Comment

Advertise