Type Here to Get Search Results !

टीम इंडिया विजयी ; मालिका ५-० ने जिंकली


माउंट माउंगनुई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिका ५-० अशी जिंकली विराट आणि कंपनीचा हा ऐतिहासिक मालिका विजय ठरला. 
भारताच्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला चांगली सुरुवात करता आली नाही. न्यूझीलंड आपले पहिले तीन फलंदाज फक्त १७ धावांत गमावले. पण त्यानंतर आपला शंभरावा सामना खेळणारा रॉस टेलर आणि टीम साइफर्ट यांनी दमदार फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. टेलर आणि साइफर्ट यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. नवदीप सैनीने साइफर्टला बाद करत ही जोडी फोडली, त्याने ३० चेंडूंमध्ये पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. साइफर्ट बाद झाल्यानंतर टेलरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अर्धशतक पूर्ण केले.  
हंगामी कर्णधार रोहितने यावेळी संघाच्या क्रमवारीत बदल केला. युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला. पण संजूला या संधीचा फायदा उठवता आला नाही आणि २ धावा करून तो बाद झाला. 
संजू स्वस्तात बाद झाला असला तरी त्यानंतर रोहित आणि लोकेश राहुल यांनी संघाला डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. पण मोठा फटका मारण्याचा नादात तो बाद झाला. पण राहुल बाद झाला असला तरी रोहितने एका बाजूने जोरदार फटकेबाजी केली. रोहितच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. 
परंतु शार्दुल ठाकूर, जसप्रीत बूमराह व नवदीप सैनी यांच्या शानदार गोलंदाजीने भारताने सामना जिंकला. शेवट्या ओव्हर मध्ये मात्र सोधीने तीन दोन षटकार मारत सामन्यात रंगत आणली होती परंतु त्याची खेळी संघाला विजय मिळवून देवू शकली नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies