सदाभाऊंच्या हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ ; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, February 13, 2020

सदाभाऊंच्या हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ ; राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश


सदाभाऊंच्या हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ ;  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : खानापूर आटपाडी मतदार संघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा आज मिरज येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.
 माजी आमदार पाटील यांनी मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदारकी तसेच काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम केले. मागील २०१४ आणि २०१९  विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडून सलग दोन वेळा पराभव झाल्यानंतर माजी आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर घालण्याचा निर्णय घेतला. पक्षांतर्गत गटबाजीमुळे माजी आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची जोरदार चर्चा खानापूर मतदारसंघात आहे.
आज मिरज-सांगली रोड येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट टिळकनगर मैदानावर दुपारी १.०० वा. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माजी आमदार सदाशिव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise