अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई थकीतच. पंचनाम्याची यादी १३७ : अनुदान मात्र ११३ शेतकऱ्यांना ; चिंचाळे येथील प्रकार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, February 1, 2020

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई थकीतच. पंचनाम्याची यादी १३७ : अनुदान मात्र ११३ शेतकऱ्यांना ; चिंचाळे येथील प्रकार


माणदेश एक्सप्रेस न्युज
खरसुंडी/मनोज कांबळे : चिंचाळे (ता.आटपाडी) येथील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने आटपाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, चिंचाळे गावातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून १३७ शेतकऱ्यांची यादी आटपाडी तहसील कार्यालयाकडे सादर केली होती. त्यापैकी ११३ शेतकऱ्यांचे अनुदान जमा झाले आहे. मात्र उर्वरित २४ शेतकऱ्यांचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे अनुदान जमा करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.  एकूण शेतकऱ्यांचे झालेले पंचनामे आणि प्रत्यक्षात मदत मिळालेल्या शेतकऱ्यांची आकडेवारी यामध्ये तफावत आहे. त्यामुळे महसूल विभाग याकडे गांभर्याने लक्ष देऊन उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

No comments:

Post a Comment

Advertise