विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; पतीसह पाच जणांवर गुन्हा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; पतीसह पाच जणांवर गुन्हा.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी पौर्णिमा सचिन माने (वय -३५) रा. नागू नारायणवाडी डोनगाव रोड सुभद्राबाई मंगल कार्यालय समोर,सध्या रा, जुनी मिल चाळ सुपर मार्केट मुरारजी पेठ,सोलापूर यांना पतीसह सासरच्या मंडळींनी विनाकारण मानसिक व शारीरिक त्रास करून माहेरच्या लोकांना शिवीगाळ केली. व तसेच फिर्यादीला माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये ये नाहीतर तुला असाच त्रास देत राहील अशी धमकीही दिली.याबाबत आरोपी दगडू कृष्णा माने,नितीन दगडू माने,प्रवीण दगडू माने,भिमाबाई दगडू माने,सचिन दगडू माने सर्व रा.नागू नारायणवाडी डोनगाव रोड सुभद्राबाई मंगल कार्यालय, यांच्याविरुद्ध सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise