Type Here to Get Search Results !

अनुसूचित क्षेत्रातील वनविभागाची बेकायदेशीर कामे बंद करा - बिरसा क्रांती दल संघटनेची मागणी.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पुणे प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील सुरू असलेली वन विभागाची कामे तातडीने थांबविण्यासाठी बिरसा क्रांती दलाच्या वतीने पुणे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांना निवेदन दिले.
              त्यावेळी राज्य सचिव डी बी घोडे, राज्य संघटक बाळकृष्ण मते, पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे ,जिल्हा महासचिव सुदाम मराडे ,सह्याद्री आदिवासी विकास मंडळ अध्यक्ष कृष्णा भालचिम, एम के कोकणे, सोना पारधी, तुषार गवारी,दीपाली पारधी,वैशाली मुदगुण, विजय दांगट,अविनाश मुंढे, आदी उपस्थित होते
      मराडे म्हणाले, आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रपतींच्या आदेशानुसार जे अनुसूचीत क्षेत्र घोषित आहे त्या भागातील पेसा कायदा लागू असलेल्या तिरपाड हद्दीतील कोणतेही काम करताना तेथील पेसा ग्रामसभेची परवानगी लागते परंतु वन विभागाने पेसा कायद्याचे उल्लंघन करून व राज्यपालांच्या आदेशाला न जुमानता परस्पर अनधिकृतपणे वनक्षेत्रात तारेचे कुंपणाचे काम सुरू केले आहे त्या कामामुळे आदिवासींच्या शेतजमिनीवर जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असून दळणवळणासाठी जाण्या-येण्याचा रस्ता सुद्धा बंद होणार आहे. सदर कुंपणामुळे वन्य प्राण्यांना इकडे तिकडे फिरण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.
   घोडे म्हणाले,6 जुलै 2017 सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ज्या विभागाने अनुसूचित जमाती प्रवर्गांची जाहिरात सोडल्या नाहीत त्यांनी लवकरात लवकर जाहिरात सोडावी तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे नाहीतर तीव्र जन आंदोलन करू असे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies