विजापूर नाका हद्दीतील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

विजापूर नाका हद्दीतील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : विजापूर नाका हद्दीतील बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा टाकून तेथील एका पीडित महिलेची सुटका करून एका महिलेसह तीन पुरुषांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालवणारी रशिदा समदअली लष्कर हिने पुन्हा एकदा कुंटणखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी ब्लॉक नंबर दहा माजी सैनिक नगर जुना विजापूर नाका सोलापूर येथे कुंटणखान्यात चालूू असलेल्याची खात्री पटल्याने सापळा रचून कारवाई करण्यात आली. व त्या ठिकाणी मिळून आलेली एक पीडित महिलेची सुटका केली. व रशीदा समदअली लष्कर व तिला मदत करणारे दोन पुरुष तिचा नवरा मोहम्मद तालीब म. अस्लम अन्सारी वय-२३रा. जिल्हा बिजनोर निजीबाबाद, उत्तर प्रदेश. सध्या राहणार ब्लॉक नं १० माजी सैनिक नगर, जुना विजापूर नाका,सोलापूर व तुषार शिवशरण बनसोडे वय-२३ रा. झोपडपट्टी नंबर एक विजापूर नाका सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,६ भादविसंक.३७० कायदेशीर कारवाई करून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वी देखील रशीदा हिने अशाच प्रकारे कुंटणखाना चालवत होती. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहा.. पोलीस आयुक्त अभय डोंगरे, यांच्या समन्वयाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षा कडील पोलीस निरीक्षक शिरीष शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ, सुवर्णा काळे, अर्चना गवळी, ज्योती मोरे, मुजावर, भुजबळ, खरात यांनी पार पडली.


No comments:

Post a Comment

Advertise