सांगोल्यातील कन्या प्रशालेला कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय नाव. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

सांगोल्यातील कन्या प्रशालेला कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय नाव.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगोला प्रतिनिधी : ३३ वर्षापूर्वी मुलींची शिक्षणाची शहरात स्वतंत्र सोय व्हावी, यासाठी कै.वामनराव शिंदे साहेब यांनी सांगोल्यात कन्या प्रशालेची स्थापना केली. शैक्षणिक दर्जा व सुविधा यामुळे या संस्थेचा वटवृक्ष बहरला. कै.वामनराव शिंदे साहेब यांनी कन्या प्रशालेची स्थापना केली. त्यामुळेच बहुजनांची मुले शिक्षित झाली. या प्रशालेला कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालय असे नामकरण होणार आहे. याला शासनाची मंजूरीही मिळाली आहे. अल्पावधीत नावारुपास आलेली ही शाळा विद्यार्थीनींना मोफत शिक्षण देत होती.  २०१५ मध्ये संस्था स्वतःच्या  इमारतीमध्ये गेली. शाळेची पटसंख्याही वाढली. त्यामुळे मुले व मुली असा भेद न करता सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन देण्याचा मानस संचालक मंडळाने केला. त्याप्रमाणे मुलांनाही प्रवेश मिळणार आहे. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत खाजगी वाहनाची सुविधा निर्माण करुन दिली. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश मोफत पुरविल्याचे मुख्याध्यापिका घोरपडे यांनी सांगितले. या शाळेत इ.५ वी ते इ.१० वी च्या शिक्षणाची सोय आहे. येथील सेमी इंग्लिश शिक्षणाच्या सोयी बरोबरच मराठी माध्यमात अनेक विद्यार्थी सध्या शाळेत शिक्षण घेत आहेत. 

चौकट  संस्थापक कै.वामनराव शिंदे साहेब यांनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करुन सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व मोफत शिक्षण मिळाले पाहिजे असा आग्रह असायचा. या तत्त्वावर ही प्रशाला विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य व सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्याचे कार्य अखंडपणे करीत आहे.-मुख्याध्यापिका, सौ.सुवर्णप्रभा बाळकृष्ण घोरपडे.No comments:

Post a Comment

Advertise