Type Here to Get Search Results !

नागापूर येथील श्री नागनाथ देवस्थानची तीन दिवस चालणार यात्रा पशुप्रदर्शन मेळावा व भव्य कुस्त्यांचा रंगणार सामना.


माणदेश एक्सप्रेस न्यूज
परळी : परळी तालुक्यातील नागापूर येथील श्री नागनाथाच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी तीन दिवस यात्रा चालणार असून यात्रेला सोमवार, दि.6 जानेवारी रोजी सुरवात होणार आहे.
ही यात्रा बुधवार दि.08 रोजी पर्यंत चालणार आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता पशु प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा.टी.पी.मुंडे सर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ताप्पा इटके गुरूजी तर प्रमुख पाहुणे प्रदीपभैय्या मुंडे, राजेश देशमुख, श्रीहरी मुंडे यांच्या उपस्थित कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. त्याच दिवशी रात्री 9 वा ह.भ.प.अशोक महाराज आळंदीकर यांचे किर्तन होणार आहे. मंगळवारी (ता.7) प्रभू नागनाथ देवस्थानचा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून रात्री ह.भ.प.भगवान महाराज मोरे यांचे कीर्तन होईल तसेच रात्री 8 वा. शोभेची दारूही उडविण्यात येणार आहे तर रात्री 12 वाजता  श्री नागनाथाची पालखी निघेल.
बुधवारी (ता.8) सकाळी आरतीपूजा होईल त्यानंतर, व्हॉलीबॉल स्पर्धा, दुपारी 2 ते 5 जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर यात्रेची सांगता बक्षिस समारंभाने होणार आहे. बक्षीस समारंभ माजी सभापती सौ.कल्पना मोहनराव सोळंके यांच्या हस्ते होणार आहे. या तीन दिवसीय यात्रेचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान संस्थेचे सेक्रेटरी कुंडलीकराव सोळंके, अध्यक्ष बालासाहेब मिसाळ, सरपंच मोहनराव सोळंके, उपसरपंच शिवराज मुंडे यांच्यासह प्रभाकरअप्पा तोंडारे, हनुमंत कुलकर्णी, अर्जुन सोळंके, पत्रकार बालकिशन सोनी आदींसह समस्त नागापूर गावकरी मंडळींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies