माणमधील शिक्षक हे चांगली पिढी घडवायचं काम करत आहेत : आमदार जयकुमार गोरे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, January 8, 2020

माणमधील शिक्षक हे चांगली पिढी घडवायचं काम करत आहेत : आमदार जयकुमार गोरे.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
म्हसवड प्रतिनिधी : प्राथमिक शिक्षक बँक ही आदर्श बँक आहे. या बँकेच्या माध्यमातून चांगले उपक्रम राबविले जातात. माणमधील शिक्षक हे चांगली पिढी घडवायचं काम करत आहेत. संघर्ष आपल्या रक्तात आहे, आपण जिल्ह्याला दिशा देण्याचं काम करत असतो. शिक्षकांना माझं सांगणं हेच राहिल की एक आदर्श पिढी घडविण्याचं काम आपण करावं. गावागावातील प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळण्यासाठी आपल्याला जिल्हा परिषद शाळा टिकवल्या पाहिजेत व वाढवल्या पाहिजेत. सर्व सेवानिवृत्त शिक्षक, गुणवंत शिक्षक व गुणवंत पाल्यांनी यापुढेही समाजासाठी आपलं योगदान द्यावं असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले. 
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि. सातारा या बँकेच्या दहिवडी व म्हसवड (ता.माण) या शाखांच्या संयुक्त विद्यमाने दहिवडी येथील स्वाती मंगल कार्यालयात आयोजित सेवानिवृत्त शिक्षक, गुणवंत शिक्षक व पाल्यांचा गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी जि. प. अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा परिषद सदस्य अरूण गोरे, व्हा.चेअरमन महेंद्र अवघडे, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, बंडोबा शिंदे, चंद्रकांत आखाडे, वैशाली जगताप,रामचंद्र लावंड, अ. शि. पोळ, बापूराव जगदाळे, नारायण गंबरे, मोहनराव जाधव, राजेंद्र कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख म्हणाले,  आयुष्यातील अनेक वर्षे ज्ञानदानासाठी खर्ची केली त्या शिक्षकांचा गौरव होणं हे कौतुकास्पद आहे. शिक्षक हे गावातील पिढी घडवतात किंबहुना काही शिक्षकांचं काम इतकं चांगलं असतं की त्या शिक्षकाच्या नावाने शाळा ओळखली जाते. शिक्षकांची भूमिका ज्ञान देण्यापुरती मर्यादित नसून चांगली माणसं घडवणं हे शिक्षकांचं खरं काम आहे. चांगलं शिक्षण जिथं दिलं जातं तिथं चांगली पिढी तयार होवून विकासाचा वेग वाढून समृध्दी येते. सेवानिवृत्तांनी आपल्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी करावा. गुणवंत विद्यार्थ्यांनी माणदेशाचं नाव मोठं करण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न करावेत.

 व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे यांनी प्रास्ताविक केले. राजाराम तोरणे व सविता नवत्रे यांनी सुत्रसंचालन केले तर संचालक बंडोबा शिंदे यांनी आभार मानले.
या वेळी सुभाष गोंजारी महेश माने शिवदास खाडे, हणमंत अवघडे ,हरीश गोरे बळीराम वीरकर सुधाकर काटकर श्रीमंत खाडे शंकरराव शिंदे, राजाराम पिसाळ,किशोर देवकर,जगन्नाथ वीरकर,रमेश कापसे, महेंद्र कुंभार,नारायण आवळे,बाळासो पवार  मान्यवर उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Advertise