हातगावात संत सावता प्रतिष्ठानतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

हातगावात संत सावता प्रतिष्ठानतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.माणदेश एक्सप्रेस न्यूज 
शेवगाव प्रतिनिधी : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे श्री संत सावता प्रतिष्ठानच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी बोधेगाव येथील आबासाहेब काकडे कॉलेजचे प्रा.महादेव मुंढे यांचे व शिवरत्न पुरस्कार प्राप्त गायक व गीतकार के.बी शेख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा.मुंढे म्हणाले की, अठराव्या शतकात पहिली मुलींची शाळा सुरू करून जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याने स्त्री शिक्षणाचा पाया रचला. व स्त्रीयांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देत समाज सुधारणेचे महत्वपूर्ण कार्य केले.अशा थोर समाज सुधारकांचे विचार सर्वांनी अंमलात आणणे ही काळाची गरज आहे.असे परखड विचार मुंढे यांनी व्यक्त केले. 
              या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप अभंग हे होते. यावेळी शिवरत्न पुरस्कार प्राप्त गायक व गीतकार के.बी.शेख, अशोक गुंजाळ, शहनवाज बागवान, नवाब पटेल, भगवान बाबा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष मयुरराजे वैद्य, सेवा संस्थेचे माजी व्हा.चेअरमन संजय गलांडे, कु.साक्षी दिगांबर साखरे यांनी ही आपले विचार व्यक्त केले आहेत. तर या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच सौ.बेबीताई चंद्रकांत भराट, उपसरपंच चरणसिंग परदेशी, ग्रा.पं.सदस्य हिराबाई अभंग, प्रमोद मिसाळ, बाळासाहेब सूसे, किसन अभंग बाळासाहेब देशमुख, संतोष गुंजाळ, भारत अभंग, मनोज अभंग, रामेश्वर अभंग, अविनाश अभंग, राहुल अभंग, ज्ञानेश्वर गादे, शंकर फुलझळके, वसंत अभंग, अंगद अकोलकर, दिपक सुसे, सागर गादे, आबा सुसे, दिनेश अभंग, अमोल रासकर, दिनेश गिरी, शंकर बनसोडे,  संजय सुसे, भीमा बुटे, गणेश फुलझळके, किशोर अभंग, कृष्णा जाधव,शाम बुटे,सचिन अभंग, संदिप जौंजाळ,आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अविनाश बुटे यांनी केले असून, सूत्रसंचालन सचिन अभंग यांनी केले. तर आभार एकनाथ सुसे यांनी मानले आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री संत सावता सामाजिक प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment

Advertise