आटपाडीत संभाजीशेठ पाटील यांचा जाहीर सत्कार ; सत्कारानिमित्त प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे जाहीर व्याख्यान - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 17, 2020

आटपाडीत संभाजीशेठ पाटील यांचा जाहीर सत्कार ; सत्कारानिमित्त प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे जाहीर व्याख्यान

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : आटपाडीतील युवा नेते व प्रसिद्ध गलाई व्यवसायिक संभाजीशेठ पाटील यांचा 16 जानेवारी रोजी तुळापूर (तालुका हवेली जिल्हा पुणे) येथे श्री शंभुराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल आटपाडी येथे आज दि. 17 रोजी सायंकाळी पाच वाजता बाजार पटांगण येथे  बाबाराजे देशमुख (संस्थापक मराठा साम्राज्य संघ महाराष्ट्र राज्य) व प्रमुख वक्ते श्रीमंत कोकाटे सर (इतिहास संशोधक) यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सत्कार होणार आहे. 
आटपाडी येथे आज बस स्थानक ते बाजार पटांगण अशी रॅली काढण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठान, जगदंब ग्रुप, संभाजीशेठ पाटील मित्र परिवार व सुरज आपारमेंट सदस्य यांच्यावतीने करण्यात येणार आहे. तरी आटपाडीतील सर्व नागरिकांनी या जाहीर सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजीशेठ पाटील यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise