मनपाच्या साईबाबा शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

मनपाच्या साईबाबा शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
मुंबई : मनपाच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल लालबाग परळ मुंबई येथील शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविधरुपी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा शिक्षक श्री योगेश साळवी सर यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तर  शिक्षिका छाया शेळके यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या कार्याची महती सांगितली. या भावपूर्ण कार्यक्रमात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन "मी सावित्रीबाई " अशी वेशभूषात्मक व्यक्तिरेखारेखाटुन अभिवादन केले आणि त्यांची महती कथन केली. शिक्षिका सीमा पाटील यांनी या कार्यक्रमाचे साचेबद्ध नियोजन करून विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले काही विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि अगाध कीर्तीचा गोडवा कथन केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यानी
खूप मेहनत घेतली. शाळेच्या ट्रस्टी मीनल श्रीनिवासन, शिक्षिका आश्विनी पोटे ,  विशाल सर , शिवानी मॅडम , सविता सरतापे मॅडम , मुख्याध्यापक गजभिये सर,  मुख्याध्यापिका मांजरेकर मॅडम यानी सर्व
सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशा तऱ्हेने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम भावपूर्ण रीत्या संपन्न झाला.No comments:

Post a Comment

Advertise