पावणेदोन लाख रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांची व गॅस सिलेंडरची चोरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

पावणेदोन लाख रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांची व गॅस सिलेंडरची चोरी.माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : घराचा कडी-कोयंडा कशाने तरी कापून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दोन सिलेंडर चोरून नेल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी ओमप्रकाश लक्ष्मीनारायण आडम (वय-४३) रा.३१७/३१८ पिट्टा नगर, जुना विडी घरकुल,सोलापूर यांच्या कारखान्याची व राहत असलेल्या दाराचा कडी कोयंडा कशाने तरी कापून गोदरेज कपाट उचकटून १ लाख ८२ हजार ४०० रुपये रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने व दोन गॅस सिलेंडर च्या टाक्या असा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना दि. २ ते ३ जानेवारीदरम्यान घडली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई मुरकुटे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise