स्वेरीचे संशोधन कार्य कौतुकास्पद : शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत डोळस; व्ही.एन.आय.टी.चे डॉ. प्रशांत डोळस यांची स्वेरीला सदिच्छा भेट. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, January 8, 2020

स्वेरीचे संशोधन कार्य कौतुकास्पद : शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत डोळस; व्ही.एन.आय.टी.चे डॉ. प्रशांत डोळस यांची स्वेरीला सदिच्छा भेट.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पंढरपूर प्रतीनिधी : ‘भारतीय संशोधन क्षेत्रात विकासाला आणि प्रगतीला प्रचंड वेग आला असून स्वेरीतील विविध संशोधन कार्य पाहता स्वेरीचे कार्य अदभूत असून निश्चित कौतुकास्पद आहे.’ असे प्रतिपादन इस्रोचे माजी शास्त्रज्ञ,राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे महाराष्ट्र सरकारचे सल्लागार, नागपुर सेंटर, व्ही. एन. आय. टी. कॅम्पसचे ऑफिस इनचार्ज शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत डोळस यांनी  केले.
      शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत डोळस यांनी नुकतीच स्वेरी कॅम्पसला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी संशोधन विभाग पाहून अत्यंत प्रेरित झाले. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी डॉ. डोळस यांचे स्वागत केले. स्वेरीमध्ये राजीव गांधी तंत्रज्ञान आयोग अंतर्गत स्वेरीने भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्या तांत्रिक सल्याने आर.एच.आर.डी.एफ., डीएई औटरिच सेंटरची स्थापना कॉलेजने २०१३ ते २०१६ या प्रकल्प कालावधीमध्ये केली आहे. डॉ.डोळस यांनी स्वेरीच्या संशोधन प्रकल्पाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. प्रकल्पाचा कालावधी संपल्यानंतर ही आज ज्या पद्धतीने स्वेरीने हे विभाग अद्याप कार्यन्वीत ठेवलेल आहे त्याबद्दल संस्थेचे व सेंटरचे कौतुक डॉ. डोळस यांनी केले. इस्रोत कार्यरत होण्यापूर्वी आय.आय.टी.मधून एम. टेक व जॉर्जीया टेक यु.एस.ए. येथून एरोस्पेस या विषयात पीएचडी ही पूर्ण केली. तसेच स्वेरीचे डॉ. प्रशांत पवार यांची पी.एच.डी.ही आय.आय.एस.सी. बेंगलोर येथून ‘एरोस्पेस’ या विषयात पूर्ण केले तर पोस्ट डॉक्टरेट पदवी ही दक्षिण कोरियातील कोन्कुक विद्यापीठातून संपादित केली. या  दरम्यान दोघांची ‘ड्रोनचा शेतीसाठी वापर कसा करता येईल?’ या विषयावर बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर स्वेरीची व स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांची माहिती घेतली. यावेळी शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ. एस. आर. पाटील, नेट वर्कींगचे प्रा. अंतोष दायडे, आर.एच. आर.डी. एफ. औटरिच सेंटरचे गजेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise