हिम्मत असेल तर मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील व समर्थक सदस्यांनी राजीनामे द्यावे : किरण साठे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, January 9, 2020

हिम्मत असेल तर मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील व समर्थक सदस्यांनी राजीनामे द्यावे : किरण साठे.

माणदेश एक्सप्रेस न्यूज
अकलूज प्रतिनिधी : मोहिते पाटील यांच्या प्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व समर्थक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करावा,असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केला आहे.

पक्षामध्ये राहून व पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असताना व सद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य असून पक्षाने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी पक्षांतर्गत बंदी कायद्याचे उल्लंघन केलेल्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे असे अपील सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे, त्याचा निकाल जो लागेल तो लागेल.मात्र काही सदस्य मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील आहेत,त्यांनीही आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे आणि भाजपमध्ये प्रवेश केला पाहिजे,परंतु मोहिते पाटील यांचे समर्थक असलेले काही जिल्हा परिषद सदस्य म्हणतात की  मनाने आम्ही केंव्हाच भाजपचे झालो आहे,मग मोहिते पाटील यांचा पक्ष भाजप आहे तर मग आपण राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काय करताय? राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या ना असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी विचारला आहे.

मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तीने  व  कार्यकर्त्यांनी पवार कुटुंबातील व्यक्तीवरती अनेक प्रकारच्या टिका टिप्पणी केली होती,तर मग मोहिते पाटील यांच्या समर्थक जिल्हा परिषद सदस्यांना माझा सवाल आहे,की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवारांचा आहे,आणि मोहिते पाटील कुटूंब हे भाजपमध्ये आहे,तर तुम्ही कोणत्या तोंडाने सांगताय की आम्ही केंव्हाच भाजपवशी झालो आहे, हे बोलणे म्हणजे आपण अज्ञान असल्याचे प्रतीक आहे,आपण मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने निवडून आला आहेत तर मग ज्या दिवशी मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच वेळेस आपण का राजीनामा दिला नाही? असा प्रश्न किरण साठे यांनी विचारला आहे.
हिम्मत असेल तर मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील व मोहिते पाटील यांच्या समर्थक जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग आपण भाजपवशी झाल्याचे बोलले पाहिजे,अन्यथा आपला आरोप हा बालिशपणाचा आहे,हे सिद्ध होण्यासाठी कोणत्या जोतिषाची गरज आहे असे मला वाटत नाही.असा टोलाही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी मोहिते पाटील समर्थक व  कुटुंबातील जिल्हा परिषद सदस्य व  मोहिते पाटील यांना लगावला आहे.

आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join                                      होण्यासाठी Click करा.


No comments:

Post a Comment

Advertise