Type Here to Get Search Results !

कर्जमाफीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक : बापुराव बनगर.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
वरकुटे मलवडी/प्रतिनिधी : राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करून राज्यातील शेतकरी चिंतामुक्त करणार अशी घोषणा दिली होती, एवढेच नव्हे तर त्यांच्या जाहिरनाम्यात रितसर तसा उल्लेखही केला होता. मात्र कर्जमाफी देताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. थकीत कर्जदारांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. त्याच पटीत नियमित कर्ज भरणाऱ्यां शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा आशाप्रकारचे प्रतिपादन पाणी संघर्ष चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते बापुराव बनगर यांनी व्यक्त केले...
              स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या सात बारा कोरा करून शेतकरी कर्जमुक्त करावा या मागणीसाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यास पाठिंबा देण्यासाठी वरकुटे-मलवडी , बनगरवाडी , महाबळेश्वरवाडी , कुरणेवाडी गावातील शेतकरी बांधवांनी एकत्र येवून वरकुटे-मलवडी येथील मुख्य रस्त्यावरून रँली काढून बाजारपेठ बंद ठेवून आघाडी शासनाच्या लबाडीचा जाहीर निषेध व्यक्त केला.
     यावेळी वरकुटे-मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप,बनगरवाडीचे माजी सरपंच भारत अनुसे,महाबळेश्वरवाडीचे सरपंच अंकुश गाढवे,रासप माण - खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रा.सचिन होनमाने , महाबळेश्वरवाडीचे माजी सरपंच विजय जगताप , माजी चेअरमन कांतीलाल खांडेकर , माजी चेअरमन सुनिल थोरात , विलास खरात , धिरज जगताप , काशिनाथ आटपाडकर आदी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वरकुटे-मलवडी गावातील प्रमुख मार्गावरून रँली काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देवून गाव बंद करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. रँलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले.यावेळी माजी सरपंच भारत अनुसे , सरपंच अंकुश गाढवे , प्रा सचिन होनमाने यांनी मनोगतातून शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडल्या . माजी सरपंच जयसिंग नरळे , माजी चेअरमन हणमंत आटपाडकर , सदाशिव बनगर , सरपंच प्रल्हाद अनुसे , संजय शिंगाडे , शिवाजी तोडकर , अशोक फडतरे , मोहन जगताप , बाबाराजे हुलगे , बाबा मंडले , रामा पिसे , उपसरपंच सागर बनगर अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies