माळखांबी शाळेच्या शैक्षणिक सहलीत 'पुणे दर्शन' व विविध पर्यटन स्थळांना भेटी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, January 2, 2020

माळखांबी शाळेच्या शैक्षणिक सहलीत 'पुणे दर्शन' व विविध पर्यटन स्थळांना भेटी.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस प्रतिनिधी : तालुक्यातील जिल्हा  परिषद शाळा माळखांबी शाळेची सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील मधील शालेय उपक्रमांतर्गत शैक्षणिक सहल 'पुणे दर्शन' नुकतीच उत्साही वातावरणात संपन्न झाली.
         ही शैक्षणिक सहल दि.30/12/2019 ते 31/12/2019 अखेर दोन दिवस व एक रात्र मुक्कामी होती.यामध्ये मोरगाव,प्रतिबालाजी,कात्रजचे प्राणी संग्रहालय,शनिवार वाडा,आळंदी,ओझर,लेण्याद्री,शिवनेरी व देहू आदी पुणे परिसरातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यात आल्या.
             शाळेतील विद्यार्थ्यांना भौगोलिक,ऐतिहासिक तसेच पर्यावरणाविषयी जागृती होण्याकरिता सदर सहलीचे आयोजन करण्यात आले होते.या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला.महाराष्ट्रातील किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव आहे.शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शिवनेरी किल्ल्यावर साफसफाई करत किल्लेसंवर्धन ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव करून दिली.विद्यार्थी व  शिक्षक यांनी मिळून शिवनेरी किल्ल्यावरील स्वच्छता केली.
     ही शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र क्षीरसागर,शिक्षक दत्तात्रय लोखंडे,अशोक पाटील,ज्ञानेश्वर कोष्टी,दत्तात्रय कांबळे,सुनिता पवार,प्रवीण कळसाइत व विष्णू जायभाय यांनी काम पाहिले.No comments:

Post a Comment

Advertise