सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना मुक्तीची कवाडे खुली केली : डॉ.कुमार लोंढे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना मुक्तीची कवाडे खुली केली : डॉ.कुमार लोंढे.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
 माळशिरस प्रतिनिधी :  तालुक्यातील चांदापुरी येथे सोशल संस्था,सदाशिव देठे प्रशाला व ज्यू कॉलेज,डायमंड इंग्लिश स्कूल वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठया उत्साहात साजरा करण्यात आली सुरुवातीस बारावी कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
       यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे म्हणाले " सावित्रीबाई फुले यांचे कार्य एका जाती,एका धर्मकरिता नसून संपूर्ण मानवजातिकरिता आदर्श आहे.स्त्रियांना चूल व मूल पुरते मर्यादित ठेऊन स्त्री ही  केवळ उपभोगाची वस्तू आहे सांगणाऱ्या मनुस्मृतिस लाथाडून स्त्रियांना मुक्तीची व शिक्षणाची कवाडे खुली करून भारतीय महिलांवर अनंत उपकार केले आहेत याची जाणीव आचार व विचार अंगीकृत करणे काळाची गरज आहे.हाच विचार व संकल्प या दिनी बाळगणे म्हणजेच त्यांना खरी आदरांजली आहे हा मनोदय व्यक्त केला.प्रा.कुंडलिक साठे,अदिती देठे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले तर आभार मुख्याध्यापीका उरवने म्याडम यांनी मानले

No comments:

Post a Comment

Advertise