स्वेरीज् फार्मसीमध्ये गेस्ट लेक्चर संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, January 8, 2020

स्वेरीज् फार्मसीमध्ये गेस्ट लेक्चर संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
पंढरपूर प्रतिनिधी : गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित बी. फार्मसीच्या तिसर्याा आणि चौथ्या वर्षातील तसेच डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाकडून ‘गेस्ट लेक्चर’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नॅशनल एम्प्लॉयब्लेटी एनहान्समेंट मिशन (नीम)चे महाराष्ट्र–कर्नाटक व गोवा विभागचे प्रमुख डॉ. अमोल आचरेकर यांनी विद्यार्थ्यांना फार्मसीतील औद्योगिक क्षेत्रासंबंधी मार्गदर्शन करत होते.  
       स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या एकदिवसीय कार्यक्रमात डॉ. अमोल आचरेकर यांनी मार्गदर्शन केले.  सुरुवातीला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. प्रदीप जाधव यांनी पाहुण्यांची ओळख करून देवून  कार्यक्रमबाबत माहिती दिली. त्यानंतर डॉ.आचरेकर यांनी विद्यार्थ्यांना विविध स्किल डेव्हलपमेंट कसे करायचे? याबाबत माहिती दिली. तसेच औद्योगिक कंपन्यांना नेमके कशा प्रकारे विद्यार्थी अर्थात कुशल कामगार हवे असतात आणि त्यांच्या अपेक्षा काय असतात ? याबाबत सविस्तर माहिती दिली. यासोबतच डॉ. आचरेकर यांनी विद्यार्थ्यांनी कंपनीला मुलाखत कशी द्यावी आणि त्याला कसे सामोरे जावे याची सविस्तर माहिती दिली. यावेळी नीमचे उपविभागीय अधिकारी सौ. रुपाली आचरेकर, नीमचे सहाय्यक उपविभागीय अधिकारी निलेश कोळी, चेतन सूर्यवंशी, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, डॉ. मिथुन मनियार, प्रा. प्रज्ञा साळुंखे, प्रा. मुबिना मुजावर, प्रा.सविता शिंपले, प्रा.मंदाकिनी होळकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विजय चाकोते यांनी केले तर प्रा.ज्योती मोरे यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment

Advertise