प्रवासात तरुणीच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

प्रवासात तरुणीच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : प्रवास करत असताना एका तरुणीच्या बॅगेतून १ लाख ३५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी कलावती चैतन्य बिद्री (वय-५०) रा. राम मंदिर जनता वसाहत पुणे-९ पर्वती गल्ली नंबर ७७ पुणे व त्यांची मुलगी विजापूर येथील गुड्डापुर येथे देवाला जाण्याकरिता इंद्रायणी एक्सप्रेस ने शनिवार दि. ४ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान सोलापूर येथे आल्या. व त्यानंतर सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील विजापुर कडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. दरम्यान विजापूर ला जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी फिर्यादीने बॅक चेक केले असता ठेवलेले फिर्यादी कलावती व त्यांच्या मुलीचे ७५ हजार रुपयांचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व ६० हजार रुपये किमतीचे पावणे तीन तोळे सोन्याचे गंठण असे मिळून एकूण १ लाख ३५ रुपयांचा दैवत बॅगेतून कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना दि. ४ जानेवारी रोजी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक आरशेवार हे करीत आहेत.No comments:

Post a Comment

Advertise