शहर आणि जिल्ह्यातून मटका टोळी दोन वर्षासाठी तडीपार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

शहर आणि जिल्ह्यातून मटका टोळी दोन वर्षासाठी तडीपार.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : शहर पोलीस ऍक्ट अंतर्गत जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मटका टोळीला गुरुवारी शहराने जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.जेलरोड पोलिस ठाण्याच्या वतीने ही प्रभावी कामगिरी करण्यात आली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की,रवींद्र उर्फ बंडू उमाकांत मुसळे हा काही वर्षांपासून मटका हा अवैध व्यवसायात गुंतलेली आहे.त्याने हा व्यवसाय शहरात वाढवण्यासाठी इतर लोकांची नेमणूक केली होती.त्याने त्याचा अवैध व्यवसाय बंद करावा म्हणून पोलिसांनी त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.परंतु त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नाही.उलट मटका व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालवण्यासाठी तर इतरांनाही सामावून घेत होता.दरम्यान पोलीस आयुक्त शिंदे यांनी शहर परिसरातील बेकायदा व्यवसाय कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते.त्याअनुषंगाने शहरातील विविध भागात चुपके चुपके सुरू असलेल्या मटका व्यवसाय संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडून पोलिसांकडून कारवाईचे सत्र सुरू होते.दरम्यान प्रतिबंधात्मक कारवाई करूनही पुन्हा मटका व्यवसाय जोमाने करणाऱ्या बंडू मुसळी व त्याच्या टीम विरुद्ध जेल रोड पोलिसांनी तडीपार करण्याचा प्रस्ताव परिमंडळ कार्यालय केला होता.या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर पोलीस उपायुक्त रिमंडळ यांनी मुसळी व त्याच्या साथीदारांना सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार गुरुवारी रवींद्र मुसळे याच्यासह मोहम्मद शरीफ रहमान बागवान सिद्धारूढ मलकप्पा् तांबे सिद्धाराम चंद्रकांत गब्बू रे यांना गुरुवारी तडीपार करण्यात आले ही कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे,पोलीस उपायुक्त बापु बांगर, पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले,जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जफर मोगल,पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पवार,पोलीस हवालदार शरीफ शेख,फरीद शेख,पोलीस शिपाई तुकाराम बंदीचोडे,श्रीधर काळे,विशाल बनसोडे व मल्लिकार्जुन चमके यांनी केली

No comments:

Post a Comment

Advertise