परळी तालुका संपादक संघाच्या पदाधिकार्यां चा अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते सत्कार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, January 4, 2020

परळी तालुका संपादक संघाच्या पदाधिकार्यां चा अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते सत्कार.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
परळी - वैजनाथ प्रतिनिधी : परळी तालुका संपादक संघाच्या पदाधिकार्यां ची नुकतीच निवड करण्यात आली आहे. संपादक संघाच्या परळी तालुकाध्यक्षपदी प्रकाश सुर्यकर, उपाध्यक्षपदी राजेश साबळे, सचिव रामप्रसाद गरड, कार्याध्यक्षपदी आत्मलिंग शेटे यांच्या निवडीबद्दल तसेच अ.भा.लोकतंत्र सेनानी संयुक्त संघर्ष समितीच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुखपदी ज्येष्ठ पत्रकार विश्वास महाराज पांडे यांच्या निवडीबद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शनिवारी सकाळी मातोश्री ऑफसेट कार्यालयात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी श्री सुर्यकर, श्री साबणे, श्री गरड, श्री शेटे, श्री पांडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी रामेश्वर महाराज कोकाटे यांनी संपादक संघाच्या पदाधिकार्यांशचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळयाला मातोश्री ऑफसेटचे मालक विठ्ठलराव साबळे, कॉम्प्युटर ऑपरेटर दत्ता शिवगण, बाळासाहेब लोभे, विश्वकर्म सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष  जिवनआण्णा शिंदे, लष्करचे संपादक पंडित सोळके, सोनपेठ दर्शनचे संपादक किरण स्वामी, श्री ओझा सर, अनंत हाडबे, रामभाऊ साबळे, धर्मवीर छावाचे संपादक बाजीराव काळे, उमाकांत खके, रवि काकडे, सचिन नखाते, सुनील मालेवार, शेख बाबा आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise