सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी. 
 माणदेश एक्सप्रेस न्यूज                                                             
हिमायतनगर-प्रतिनिधी : क्रांयीज्योति सावित्रीबाई फुले जन्मोसत्व निमित्त दि जानेवारी 2020 रोजी सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल दिपनगरखडकी फाटा,ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक दिनेश राठोड हे होते.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.त्यानंतर सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी प्रतिमेचे पूजन केले.तसेच काही विद्यार्थिनींनीही प्रतिमेचे पूजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेहणाज मॅडम यांनी केले.प्रथमता विजय वाठोरे यांनी पहिल्या महिला शिक्षिका ,मुख्याध्यापिका,कवयित्री,समाजसेविका,स्त्री मुक्तीदात्या सावित्रीबाई फुले यांचा जीवनपरिचय करून देत विध्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती सांगितली.सावित्रीबाई फुले यांनी खडतर अश्या संकटांना सामोरे जात फक्त मुलींसाठीच शाळा उघडली नाही तर त्यांचे सामाजिक कार्यातही खूप मोलाचा वाटा आहे. स्त्रियांच्या आजच्या प्रगतीत त्यांचे अमूल्य असे योगदान आहे. तसेच त्यांच्या  जीवनावर आधारित -फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का हे गीत सादर केले.यानंतर मोरे मॅडम यांनीं सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी अध्यक्षीय भाषणात दिनेश राठोड यांनी माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कार्याची अन कर्तृत्वाची सर्वांना माहिती सांगितली.आभार प्रदर्शन गुरू हेंद्रे सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी दिनेश राठोड सरमोरे मॅडम,सपना मॅडम,डवरे मॅडम,दुर्गा मॅडम,सोनकांबळे मॅडम,विजय वाठोरे सर,गुरू हेंद्रे सर,अतुल बिच्चेवार सर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise