देशमुख वाडी सरपंच पदी सौ स्वाती देशमुख यांची बिनविरोध निवड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

देशमुख वाडी सरपंच पदी सौ स्वाती देशमुख यांची बिनविरोध निवड.

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी प्रतिनिधी :आटपाडी तालुक्यातील देशमुख्वडी गावच्या सरपंच पदी सौ स्वाती प्रकाश देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आटपाडीचे मंडलाधिकारी कोळी व गाव कामगार तलाठी केंगार काम पाहिले
 देशमुख वाडी ग्रामपंचायतीवर आटपाडी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र देशमुख गटाची सत्ता आहे निवडीनंतर सौ स्वाती प्रकाश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच गजानन देशमुख सदस्य सदाशिव खरसाडे सौ अपर्णा ताई अशोक देशमुख अमर देशमुख छाया देशमुख सुरेखा देशमुख धोंडूबाई माने धोंडीराम देशमुख देशमुखवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री साळुंके अशोक देशमुख प्रकाश देशमुख प्रताप देशमुख विजय देशमुख दिलीप देशमुख श्री दळवी श्रीरंग देशमुख ग्रामसेवक जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
 निवडीनंतर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अमरचे बापू देशमुख माजी सभापती हर्षवर्धन देशमुख जि प सदस्य औरंगाबाद ते बाजार समिती संचालक ऋषिकेश देशमुख पंचायत समितीचे उपसभापती रुपेश पाटील याने निवडीनंतर सौ स्वाती प्रकाश देशमुख यांचे अभिनंदन केले
तर सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांना सोबत घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करून असे प्रतिपादन यावेळी नूतन सरपंच सौ स्वाती प्रकाश देशमुख यांनी केले

No comments:

Post a Comment

Advertise