घर जागेच्या कारणावरून शिवीगाळ ; दोघांवर गुन्हा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

घर जागेच्या कारणावरून शिवीगाळ ; दोघांवर गुन्हा.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : घर जागेच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करत तुला बघून घेतो अशी धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी या तिच्या आई वडील व बहिणीचे सून समीक्षा असे घरी असताना, फिर्यादीच्या शेजारील राहणारे आरोपी मुकुंद भुतळा आनंद भुतडा रा. ४/२३ भवानी पेठ, सोलापूर हे अचानकपणेे घरात घुसले. व घर जागेच्या कारणावरून शिवीगाळ केली. व तुला बघून घेतो अशी धमकी देऊन, तेथील सिमेंटचा कट्टा तोडून नुकसान केले. ही घटना दि. ४ जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत आरोपीविरुद्धध गुन्हा दाखल करण्यात आला,असूून या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राठोड हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise