बनावट साठेखत करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, January 6, 2020

बनावट साठेखत करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : खोटे सांगून बनावट साठेखताचा दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यापार्याहवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी मल्लिकार्जुन आशय्या आरकाल (वय-५४) रा.२९/सी/२/२/ पद्या नगर, अक्कलकोट रोड,सोलापूर यांचा व त्यांच्या पत्नीचा विश्वास संपादन करून त्यांच्या बांधकाम योजनेतील रो हाऊस क्रमांक-८ हे कोणास ही विक्री केलेला नाही असे आरोपी अनिल सिद्राम श्रीराम,अनिल कन्स्ट्रक्शन ( वय-५४ ) रा. ३०/८७ पद्या नगर, न्यू पच्चा पेठ याने खोटे सांगून बनावट साठेखत तयार करून तो खरा आहे असे पटवून सांगितले. त्यानंतर तो दस्त सब रजिस्टर कार्यालयात नोंदवून दिला. व करापोटी ची संपूर्ण रक्कम घेऊन रो हाऊस क्रमांक ८ चे खरेदीखत करून पुन्हा तोच प्लॉट त्रयस्थ व्यक्तिस विक्री करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर हे करीत आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise