गोंदवले येथे रविवारी लोहार समाज वधू-वर पालक परिचय मेळावा ; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे ॲड. महेश वसव यांचे आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 17, 2020

गोंदवले येथे रविवारी लोहार समाज वधू-वर पालक परिचय मेळावा ; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे ॲड. महेश वसव यांचे आवाहन

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
म्हसवड/अहमद मुल्ला : अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांचे वतीने  अपाय कास स्व. चंद्रकांत शंकरराव वसव व उपाध्यक्ष स्व. बाबुराव जगन्नाथ कावरे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ गोंदवले बु|| ता.माण येथील बरोजी ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय, परफेक्ट टेलर शेजारी, पंढरपूर सातारा रोड येथे रविवार दि. १९ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत लोहार समाजाचातील वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असून सर्व लोहार समाज बांधवांनी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ॲड. महेश चंद्रकांत वसव यांनी केले आहे. 
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे आयुक्त कार्यालयाचे उपविभागीय आयुक्त संतोष हराळे, कर निर्धारित अधिकारी,आरती राजेंद्र पवार, बचत गट माहिती अधिकारी नवनाथ भगवान जाधव, महिला बचत गट मार्गदर्शक सौ.पूजा वसव मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमास गाडी लोहार समाजातील वधू-वरांनी पालकांसमवेत बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या वधू-वर मुला-मुलींचे ३० वर्षाच्या पुढे वय आहे व पुनर्विवाहित इच्छुकांनी सुद्धा प्रत्यक्ष हजर राहावे त्यांची ही नोंदणी केली जाणार आहे. 
पालकांनी आपली मुलगी, मुलगा यांना समक्ष घेऊन यावे. वधूवरांना घरी ठेवून येऊ नये. वधू वरांचा बायोडाटा स्वयम् परिचय दहा प्रतीमध्ये आणावा. वधू-वरांचे दोन फोटो फक्त चेहऱ्याचा तसेच संपूर्ण रंगीत फोटो आणावा. लांबून येणाऱ्या वधू-वर पालक समाज बांधवांची मुक्काम व जेवणाची सोय केलेली आहे. वधू-वरांच्या सर्व नोंदी विनामूल्य मोफत आहेत.  
या कार्यक्रमास गाडी लोहार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य, सर्व समविचारी संघटना, शाखा, समिती, सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, समाज बांधव व भगिनी उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमातच रामशास्त्री तंटामुक्त समाज समिती सभा, सुरक्षा दल, सामुदायिक विवाह सोहळा, महिला स्वयंसहायता बचत गट माहिती, जनजागृती मेळावे यासाठी योग्य मार्गदर्शन व प्रबोधन केले जाणार असुन लोहार समाज बांधवांनी  कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन अॅड.वसव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise