जेवणात डिस्काउंट न दिल्याने मारहाण ; दोघांवर गुन्हा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

जेवणात डिस्काउंट न दिल्याने मारहाण ; दोघांवर गुन्हा.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : हॉटेलमधील जेवणात डिस्काउंट दिल्याने एका बावीस वर्षाच्या तरुणास मारहाण केल्याची घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रविण चंद्रकांत शेषगिरी (वय-२२) रा.५० जगदंबा नगर,आकाशवाणी केंद्राजवळ, एमआयडीसी सोलापूर व फिर्यादीचा भाऊ हॉटेल चेतन येथे जेवणाकरिता गेले होते. हॉटेलमधील वेटर हा फिर्यादीच्या भावाचा ओळखीचा असल्याने त्यास फिर्यादीच्या भाऊ किरण याने जेवणात डिस्काउंट मागितला. त्यावेळी तेथील वेटरने डिस्काउंट नाही असे मनाला असता दोघांमध्ये वादावाद झाली. तेव्हा ते भांडण करीत आहे असे दिसत असताना फिर्यादी भांडण सोडण्यास गेले. व त्यावेळी आरोपी संदीप पाटील याने हॉटेलचा मालक व त्याचा ड्रायव्हर आरोपी किरण उन्नत यांनी शिवीगाळ करून हॉटेलमध्ये पडलेल्या लोखंडी झारीने पाठीत मारले. होत्या भांडणांमध्ये फिर्यादी च्या गळ्यातील दीड तोळ्याचे चैन पडली. हे घटना दि.१ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हॉटेल चेतन येथे घडली. याबाबत आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise