शास्त्रीनगरात विवाहितेचा मृत्यू आत्महत्या की हत्या असा संशय. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, January 3, 2020

शास्त्रीनगरात विवाहितेचा मृत्यू आत्महत्या की हत्या असा संशय.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सोलापूर प्रतिनिधी : राहत्या घरी गळफास लागल्याच्या स्थितीत दिसून आलेल्या मिनाज बाबर वळसंगकर (वय- २५ वर्षे) या विवाहितेस रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना येथील शास्त्रीनगरात आज पहाटे ४. ३० वाजण्याच्या सुमारास घडली.सासरच्या छळाला कंटाळून मिनाज हिने आत्महत्या केली असल्याचा आरोप मृताचे वडील अखिल नदाफ यांनी केला.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की येथील शास्त्री नगरातील रहिवासी मिनाज वळसंगकर हिला आज पहाटे ५. ३० वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यावेळी तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.मिनाज हिचा पती बाबर वळसंगकर काल रात्री उशिरा घरी आला होता,त्यावरून पती-पत्नीत कडाक्याचा वाद झाला.पहाटे मिनाज राहत्या घरी छताच्या वाशाला ओढणीने गळफास घेतल्याच्या स्थितीत दिसून आली.तिने रागाच्या भरात गळफास घेतला असल्याची माहिती बाबर वळसंगकर याने सिव्हिल पोलिस चौकीत सांगितली.याउलट बाबर वळसंगकर मीनाजशी नेहमी वाद करीत होता.तो पैशाच्या मागणीवरून सातत्याने त्रास देत होता त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे अखिल नदाफ यांनी सांगितले.मिनाजची आत्महत्या की हत्या  या संशयामुळे शास्त्रीनगर परिसरात खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment

Advertise